दिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका

यंदाच्या दिवाळीत चायनीज वस्तूंच्या विक्रीत तब्बल 60 टक्क्यांनी घट झाली आहे. The Confederation of All India Traders ने हा अहवाल दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन कधीच भारताची साथ देत नाही, उलट चीनचा बहुतेकवेळा पाकिस्तानलाच पाठिंबा असतो.

Updated: Nov 1, 2016, 01:54 PM IST
दिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका title=

मुंबई : यंदाच्या दिवाळीत चायनीज वस्तूंच्या विक्रीत तब्बल 60 टक्क्यांनी घट झाली आहे. The Confederation of All India Traders ने हा अहवाल दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन कधीच भारताची साथ देत नाही, उलट चीनचा बहुतेकवेळा पाकिस्तानलाच पाठिंबा असतो.

विशेषतः उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबरच चीनविरोधातही भारतीयांचा रोष वाढला होता. त्यामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही केलं जात होतं. त्याचाच परिणाम म्हणून यंदाच्या दिवाळीत भारतीय ग्राहकांनी चीनी बनावटीचे फटाके आणि लाईटसच्या माळांपेक्षा भारतीय बनावटीच्या वस्तूंना पसंती दिली.

ब-याचशा विक्रेत्यांकडे भारतीय मालाचीच मागणी ग्राहक करत होते. तर काही विक्रेत्यांनी मेक इन इंडिया असे फलक लावूनच मालाची विक्री केली.