www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
महागाईबाबत आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी वक्तव्य केलंय. महागाईवर नजर असल्याचं त्यांनी म्हटलंय. इराक संकटामुळे सध्या अनिश्चिततेचं वातावरण आहे. मात्र लवकरच महागाई आटोक्यात येईल असं रघुराम राजन यांनी म्हटलंय.
योग्य अन्न व्यवस्थापनामुळे महागाई आटोक्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. तसंच कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यात भारत सक्षम असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. अपु-या पावसाच्या अंदाजामुळेच साठेबाजी होत आहे. साठेबाजांवर आम्ही कारवाई करू असं अर्थमंत्री अरूण जेटली म्हणालेत.
दरम्यान, अरूण जेटली यांच्या साठेबाजीच्या थिअरीवर राजकीय वर्तुळात प्रचंड टीका होतेय. साठेबाजीमुळे महागाई होत असल्याचं कारण काँग्रेसचे अर्थमंत्री देत होते. आता तुम्ही त्यांचीच भाषणं म्हणण्यापेक्षा आश्वासन दिल्याप्रमाणे अच्छे दिन आणा, अशी टीका केली जातेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.