पाकिस्ताननं एनएसए बैठक रद्द करणं दुर्दैवी - राजनाथ सिंह

भारत पाकिस्तान एनएसए बैठक रद्द होण्याला पाकिस्तान कारण असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटलं आहे. तर या बैठकीसंदर्भात केंद्र सरकारनं संसदेला विश्वासात घेतलं नसल्याची टीका, काँग्रेसनं केली आहे. 

Updated: Aug 23, 2015, 05:22 PM IST
पाकिस्ताननं एनएसए बैठक रद्द करणं दुर्दैवी - राजनाथ सिंह title=

लखनऊ: भारत पाकिस्तान एनएसए बैठक रद्द होण्याला पाकिस्तान कारण असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटलं आहे. तर या बैठकीसंदर्भात केंद्र सरकारनं संसदेला विश्वासात घेतलं नसल्याची टीका, काँग्रेसनं केली आहे. 

राजनाथ सिंह सध्या तीन दिवसीय लखनऊ दौऱ्यावर आहे. कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, पाकिस्तानसोबत चर्चा रद्द होणं दुर्दैवी आहे. आम्हाला शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत. ही चर्चा पाकिस्ताननं रद्द केलीय, आम्हाला तर चर्चा करायची होती. 

दरम्यान, पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी भारत दौरा रद्द केल्यावर श्रीनगरमध्ये तणावाचं वातावरण आहे. हुर्रियतचे जहाल मतवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांना श्रीनगर पोलिसांनी नजरकैदेत टाकल्यानं फुटीरतावादी कार्यकर्ते रस्त्यावर उतलेत. या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागलाय. गिलानी एका परिसंवादात सहभागी होणार होते. पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.