प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

भारताच्या 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतील राजपथावर आज सैन्याच्या तीनही दलांचं संचलन होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक सोहळ्याला संयुक्त अरब अमीरात म्हणजे UAEचे सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर आणि अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बीन झायेद अल नहयान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Updated: Jan 26, 2017, 08:25 AM IST
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन title=

मुंबई : भारताच्या 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतील राजपथावर आज सैन्याच्या तीनही दलांचं संचलन होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक सोहळ्याला संयुक्त अरब अमीरात म्हणजे UAEचे सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर आणि अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बीन झायेद अल नहयान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

UAEचे जवान देखील परेडमध्ये सहभाग घेणार आहेत. याशिवाय देशाचं सांस्कृतीक वैभव दाखवणारे चित्ररथ हे या संचलनाचं खास आकर्षण असणार आहे. तर मुंबईतील शिवाजी पार्कमध्येही ध्वजारोहणासह पोलीस तसेच अग्नीशमन दलाच्या जवानांचं पथसंचलन होणार आहे.