आता पासपोर्ट आणि रेशनकार्डही मिळणार ऑनलाईन

हेलपाटे घाला, वेळखाऊ कामासाठी ऑफिसला दांडी मारा नाहीतर कुणाच्या तरी हातावर काहीतरी ठेऊन आपली कामं करून घ्या. असे किंवा यांसारखे इतर प्रकार तुम्हीही सर्रास पाहिले असतील. पण, आता यांतून तुमची सुटका होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 20, 2013, 01:01 PM IST

www.24taas.com, मुंबई
नवीन पासपोर्ट किंवा रेशन कार्ड काढायचंय, तर धस्स व्हायला तुम्हालाही झालं असेल. हेलपाटे घाला, वेळखाऊ कामासाठी ऑफिसला दांडी मारा नाहीतर कुणाच्या तरी हातावर काहीतरी ठेऊन आपली कामं करून घ्या. असे किंवा यांसारखे इतर प्रकार तुम्हीही सर्रास पाहिले असतील. पण, आता यांतून तुमची सुटका होणार आहे.
होय, इंटरनेटच्या युगात सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध असताना पारपत्र, राशन कार्ड व चालक परवाना इंटरनेटच्या माध्यमातून मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. ‘इलेक्ट्रॉनिक सेवा विधेयका’च्या मसुद्यास केंद्र सरकारकडून मंजूरी मिळालीय.

माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. विधेयकाचा उद्देश केंद्र व राज्य सरकारच्या सर्व सेवा इलेक्टॉनिक माध्यमातून देण्याचा आहे.