दीड महिन्यात ३५९० कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा शोध

नोटाबंदीचा निर्णय़ जाहीर झाल्यापासून गेल्या 45 दिवसात म्हणजेच दीड महिन्यात केंद्रीय आयकर विभागानं तब्बल तीन हजार पाचशे नव्वद कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा शोध लावलाय. तर तब्बल 93 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. 

Updated: Dec 23, 2016, 07:38 AM IST
दीड महिन्यात ३५९० कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा शोध  title=

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय़ जाहीर झाल्यापासून गेल्या 45 दिवसात म्हणजेच दीड महिन्यात केंद्रीय आयकर विभागानं तब्बल तीन हजार पाचशे नव्वद कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा शोध लावलाय. तर तब्बल 93 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. 

देशात 8 नोव्हेंबरपासून 760 ठिकाणी छापे आणि चौकशीची कारवाईही करण्यात आलीय. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या माहितीपत्रात ही धक्का दायक माहिती पुढे आली आहे.  आयकर विभागनं करचोरी प्रकरणी 3 हजार पाचशे 89 जणांना 21 डिसेंबरपर्यंत नोटीसाही बजवल्या आहेत.  

त्याचप्रमाणे आयकर विभागानं अंमलबजावणी संचलनालाकडे 215 आणि सीबीआयकडे 185 केसेस वर्ग केल्या आहेत. या सर्वप्रकरणांमध्ये अफरातफरी आणि आर्थिक गुन्हागारीच्या कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.