नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीनं पाठिंबा जाहीर केला आहे. अण्णा हजारेंनी सध्या जंतर मंतरवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र सदनात अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया देखील यावेळी सोबत उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्र सदनात भेट घेतली.
अण्णा हजारेंनी सध्या जंतर मंतरवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. अरविंद केजरीवाल यांनी अलिकडंच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारलीत. या पार्श्वभूमीवर या दोघा गुरू-शिष्यांची ही भेट झाली.
अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं तरी यावेळी अण्णांचा सूर थोडा बदललेला दिसतो. याआधी उपोषणाच्या माध्यमातून प्राणांची बाजी लावायला अण्णा तयार असायचे. मात्र आता समाजासाठी जगायचंय, असा निर्धार अण्णांनी जंतर मंतरवर बोलून दाखवला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.