नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकावरुन सरकारवर विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दबाव टाकल्यामुळे सरकारनं झुकतं माप घेतल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
जमीन अधीग्रहण मुद्द्यावरून सरकारवर विरोधक आणि अण्णांचा दबाव आला. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत दोन संशोधनांना मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. भूमी अधीग्रहणासाठी ग्राम पंचायतीची परवानगी घेणे आता गरजेची याहे. तसेच ७० % शेतक-यांच्या मंजुरीसाठीही भाजप सरकार तयार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीनं पाठिंबा जाहीर केला आहे. अण्णा हजारेंनी सध्या जंतर मंतरवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आजचा शेवटचा दिवस आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.