राजपथावर पहिल्यांदाच एनएसजीचे पथक करणार परेड

26 जानेवारीला राजपथावर पहिल्यांदाच नॅशनल सिक्युरीटी गार्ड अर्थात एनएसजीचे पथक परेडमध्ये सहभागी होणार आहे. एनएसजी पथकाने २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Updated: Jan 23, 2017, 10:08 PM IST
राजपथावर पहिल्यांदाच एनएसजीचे पथक करणार परेड title=

नवी दिल्ली : 26 जानेवारीला राजपथावर पहिल्यांदाच नॅशनल सिक्युरीटी गार्ड अर्थात एनएसजीचे पथक परेडमध्ये सहभागी होणार आहे. एनएसजी पथकाने २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

एनएसजी आत्तापर्यंत परेडमध्ये सहभागी झाली नव्हती. मात्र यावेळेस एनएसजी कमांडोचे पथक आपली ताकद दाखवणार आहेत. त्याशिवाय महाराष्ट्रातील एनएसएसचे १४ विद्यार्थी - विद्यार्थ्यांनींचा परेडमध्ये सहभाग असेल. राष्ट्रसेवा बरोबर समाजसेवेचे व्रत हाती घेतल्याचा संदेश एनएसएस देणार आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय सैन्याबरोबर संयुक्त अरब अमीरात म्हणजे युएईचे जवान देखील परेडमध्ये सहभाग घेणार आहेत. त्यांचे 144 जवान आणि 35 बँण्ड पथकातील जवान परेडमध्ये सहभागी होणार आहेत. फ्रान्सनंतर युएई दुसरा देश आहे. जो राजपथावरील परेडमध्ये सहभागी होतोय. 2016 मध्ये फ्रान्सचं पथक परेडमध्ये सहभागी झालं होतं.