नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरमध्ये यापुढे 'व्हॉटस अप न्यूज ग्रुप'साठी लायसन्स घेणं बंधनकारक असणार आहे.
वेगानं फैलावत जाणाऱ्या अफवा रोखण्यासाठी प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलंय. याबद्दल १८ एप्रिल रोजी एक सर्क्युलर जारी केलंय.
व्हॉटसअप सोशल माध्यम असल्यानं त्यावर कुणीही आपला ग्रुप तयार करू शकतं. काश्मीरमध्येही अनेक भागांत पत्रकारांनी अनेक असे न्यूज ग्रुप बनलेले आहेत. अनेकदा यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असतो.
मिळालेल्या आदेशानुसार, अतिरिक्त सूचना अधिकारी या ग्रुपवर नजर ठेवतील आणि जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना देतील. ग्रुपमध्ये शेअर करण्यात आलेल्या कोणत्याही पोस्ट किंवा कमेंटसाठी अॅडमिनिस्ट्रेटरला जबाबदार धरण्यात येईल.
या आदेशात सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या कोणत्याही धोरणाबद्दल टिप्पणी न करण्याबद्दल ताकीद देण्यात आलीय.
हंदवाडाच्या घटनेनंतर कश्मीर पोलीस या व्हॉटसअप ग्रुपमुळे चिंतेत आहेत. काही व्हॉटसग्रुपवर या घटनेनंतर जाणून बुजून अफवा पसरवल्या जात आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.