नवी दिल्ली : तुम्ही पीएफधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील तब्बल 4 कोटी पीएफधारक पुढील वर्षांपासून त्यांचा पीएफ तारण ठेवून घर खरेदी करु शकणार आहेत. इतकंच नव्हे तर घराचा मासिक हप्ता चुकता करण्यासाठीही तुम्ही पीएफ अकाऊंटचा वापर करु शकता.
केंद्रीय भविष्यनिर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. रॉय यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पीएफधारकांसाठी स्वस्त घराची योजना आणण्याबाबत विचार सुरु आहे. याअंतर्गत पीएफधारक त्यांच्या पीएफचे पैसे तारण ठेवून त्यावर गृहकर्ज घेऊ शकतात.
तसेच त्याच खात्यातून घराचा मासिक हप्ता फेडता येईल याचीही सुविधा असणार आहे. 2017च्या अखेरीपर्यंत योजना सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.