मोदी मँगोनंतर आता योगी मँगो

उत्तर प्रदेशातील मँगो मॅन पद्मश्री हाजी कलीमुल्ला यांनी मोदी मँगोनंतर आता नव्या आंब्याची जात विकसित केलीय. या नव्या आंब्याच्या जातीला त्यांनी योगी मँगो असं नाव दिलंय. 

Updated: May 7, 2017, 10:58 PM IST
मोदी मँगोनंतर आता योगी मँगो title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मँगो मॅन पद्मश्री हाजी कलीमुल्ला यांनी मोदी मँगोनंतर आता नव्या आंब्याची जात विकसित केलीय. या नव्या आंब्याच्या जातीला त्यांनी योगी मँगो असं नाव दिलंय. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव त्यांनी या नव्या आंब्याला दिलंय. हा आंबा बारीक, लांब आणि सुंदर असून याला पाहताच तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाता, असं वर्णन हाजींनी या नव्या आंब्याचं केलं आहे. 

नैसर्गिकरीत्या या जातीच्या आंब्यांचे उत्पन्न त्यांच्या बागेत आलंय. 'करेला' आणि 'दशेरी' यांच्या मिश्र वैशिष्ट्यांनी आंबा तयार झालाय. काही जण हाजी यांच्या आमराईत आले होते. त्यांना इथं 4-5 वेगळ्या धाटणीचे आंबे दिसले. हा आंबा पिकायला अजून महिन्याभराचा अवकाश आहे. 

मोदींच्या नावाने असलेल्या आंब्याचे झाड यंदा बहरलंय. हाजी कलीमुल्ला अनेक प्रयोग सतत करत असतात. एखादा यशस्वी झाल्यावर त्याला नाव दिलं जातं. त्यांच्या बागेत ऐश्वर्या आणि सचिन तेंडुलकरच्या नावाचेही आंबे आहेत.