सासूही करू शकेल सुनेविरुद्ध घरगुती हिसेंची तक्रार!

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधींच्या मते घरगुती हिंसेविरोधात असा कायदा बनवायला हवा, जो सूनेसोबतच सासूलाही सुरक्षा देऊ शकेल. एका इंग्रजी वृत्तपत्रानं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बातमी दिलीय.

Updated: Jul 23, 2014, 01:20 PM IST
सासूही करू शकेल सुनेविरुद्ध घरगुती हिसेंची तक्रार! title=

नवी दिल्ली: केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधींच्या मते घरगुती हिंसेविरोधात असा कायदा बनवायला हवा, जो सूनेसोबतच सासूलाही सुरक्षा देऊ शकेल. एका इंग्रजी वृत्तपत्रानं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बातमी दिलीय.

सध्याचा कायदा हा महिलेला कोणत्याही अशा पुरुषाला घरगुती हिंसेपासून वाचवतो, 'जो तिच्यासोबत एकाच घरात राहतो किंवा रक्ताचा संबंध असेल, लग्नाचा संबंध, दत्तक घेतला गेला असो किंवा संयुक्त कुटुंबातील कोणता पुरुष असो'. या कायद्यात महिलेला आरोपी बनविण्याची तरतूद नाहीय. 

मनेका गांधींचे नव्या तरतूदी करण्याच्या सूचना!

एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रानं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे लिहिलंय, महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधींनी या प्रकरणी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मुलगा आणि सूनेकडून घरगुती हिंसेला बळी पडणाऱ्या महिलांना सुरक्षा देण्याच्या तरतूदीसाठी काम करण्यास गांधींनी अधिकाऱ्यांना सांगितलंय. 

मनेक गांधींच्या जवळील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यासमोर अशा अनेक घटना आल्या ज्यात वृद्ध महिलेला त्यांच्या मुला-सुनेकडून त्रास सहन सहन करावा लागतोय. मात्र कायदा सूनविरुद्ध कारवाई करण्याची संमती देत नाही. मनेका गांधींना वाटतं की, प्रत्येक महिलेला कायद्याअंतर्गत सुरक्षा मिळाली पाहिजे, भलेही आरोपीसोबत त्यांचं काहीही नातं असो. लवकरच याविषयी नवा कायदा निर्माण केला जावू शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.