‘धर्मपरिवर्तनासाठी नव्हे मनं जिंकायला निघालोय’

आधीच धर्मांतराबाबत  वादग्रस्त वक्तव्यांवरून मोदी सरकार कोंडीत सापडलं असताना आता विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांच्या वक्तव्याने नव्या वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Updated: Dec 21, 2014, 02:36 PM IST
‘धर्मपरिवर्तनासाठी नव्हे मनं जिंकायला निघालोय’ title=

 नवी दिल्ली : आधीच धर्मांतराबाबत  वादग्रस्त वक्तव्यांवरून मोदी सरकार कोंडीत सापडलं असताना आता विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांच्या वक्तव्याने नव्या वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

‘आम्ही धर्मपरिवर्तन नव्हे तर लोकांची मनं जिंकायला निघालोय’ असं म्हणत त्यांनी विश्वहिंदू परिषदेच्या घरवापसीचं समर्थन केलंय. जागतिक शांततेसाठी हिंदू सदैव प्रयत्नच करत आलेत. लोकांचा धर्म बदलणं आमचं ध्येय नाही, हिंदुत्व रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं त्यांनी यावेळी म्हटलंय.
 
ही काळातच जगात धर्मयुद्ध होणार असल्याचंही भाकीतही त्यांनी केलंय. विश्व युद्धाचे खरे खेळाडू आहेत ते ख्रिश्चन आणि मुस्लीम... विश्वयुद्धातून आम्ही बाहेर आहोत, असंही त्यांनी म्हटलंय. 
 
महत्त्वाचं म्हणजे, हिंदू जागा होतोय आता घाबरण्याचं कारण नाही. हिंदू कोणावरही जबरदस्ती करायला गेला नव्हता. पण जे कोणी धर्मातून बाहेर पडलेत, जे वाट चुकलेत त्यांना परत आणणार असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आग्र्यात झालेल्या धर्मांतराच्या प्रकाराला एकप्रकारे पाठींबाच दिलाय. धर्मांतराला विरोध करण्यापूर्वी आधी धर्मांतर बंदी कायद्याला पाठिंबा द्या, असं आव्हान मोहन भागवतांनी दिलं.

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.