नवी दिल्ली : वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी बुधवारी नोटबंदीमुळे ऑनलाइन व्यवहारांना वाव देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता डेबिट कार्डने व्यवहार केल्यानंतर सर्विस चार्ज नाही लागणार आहे. रुपे कार्डवर देखील सर्विस चार्ज नाही लागणार आहे.
दास यांनी म्हटलं की, ई वॉलेटवरुन देखील सरकारने स्विचिंग चार्ज हटवले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन ट्रेन टिकट बुकिंगवर देखील सर्विस चार्ज लागणार नाही आहेत. शेतकऱ्यांपर्यंत फंड पोहोचवण्यासाठी नाबार्ड जिल्हा केंद्रीय सहकारी बँकांना २१ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसा पुरवला जाणार आहे.