नवी दिल्ली : जगात १३ क्रमांकाच्या इमारती, घरं खरेदी करत नाही तसंच लग्नासाठी १३ क्रमांकाची तारीखही ठरवत नाहीत याचं कारण म्हणजे १३ य़ा क्रमांकाला जगात अशुभ मानलं जातं.
काहीसा तसाच प्रकार आपल्या देशातील संसदेत होत आहे. लाकसभेत ४२० क्रमांकाला बैठकचं दिेलेली नाही. ५५० सदस्यांची संख्या असलेल्या या दालनात कोणालाही ४२० क्रमांकाची बैठक कोणालाही लागू केलेली नाही.
१४व्या लोकसभेपासूनच या बैठकीला लागू करत नाही आहेत. भारतीय दंड संहितेवेळी खोटी कागदपत्रं बनवणाऱ्यांच्या विरूद्ध कलम ४२० अनुसार खटला भरला जातो.
कुठल्याही सन्मानित व्यक्तीसाठी ४२० क्रमांकाची बैठक मिळणं खूप शरमेची बाब आहे म्हणून लोकसभेतील एका सदस्यानं या क्रमांकाला लागू करण्यावर आक्षेप घेतला.
यानंतर लोकसभेतील सदस्यांना बैठक लागू करताना ४१९ क्रमांकाच्या बैठकीनंतर ४२० क्रमांकाऐवजी ४१९-ए हा क्रमांक दिला गेला आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे नेते बदरुद्दीन अजमल यांना १५व्या लोकसभेत ४१९-ए क्रमांकाची बैठक मिळाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.