नवी दिल्ली : देशातली प्रख्यात आयटी कंपनी 'इन्फोसिस'नं आपल्या ऑफिसच्या ड्रेस कोडमध्ये महत्त्वाचा बदल केलाय.
इन्फोसिसचे कर्मचारी यापुढे 'वर्किंग डे'लाही कॅज्युअल कपडे परिधान करून ऑफिसमध्ये जाऊ शकणार आहेत. इन्फोसिसनं आपली 'सूट-बूट'ची संस्कृती संपुष्टात आणत सोमवारपासून कर्मचाऱ्यांना कॅज्युअल्समध्ये ऑफिसमध्ये येण्याची परवानगी दिलीय.
कर्मचाऱ्यांसोबत खेळीमेळीचं वातावरण निर्माण करण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. 'सोमवार, 1 जून 2015 पासून तुम्ही स्मार्ट बिझनेस कॅज्युअल्स परिधान करू शकाल' असा ऑफिशिअल मेलचं कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना धाडलाय.
त्यामुळे, कंपनीचे कर्मचारी आता कोणत्याही दिवशी जीन्स, टी-शर्ट किंवा आणखीही काही परिधान करून ऑफिसमध्ये जाऊ शकतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.