बंगळुरू: एका महिलेनं आपल्याच मुलावर रेप केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत समोर आलीय. आपला मुलगा गे असून त्याची समलैंगिकता दूर करण्यासाठी तीनं असं केल्याचं कळतंय.
या घटनेचा खुलासा झाला जेव्हा दीप्ति ताडंकी नावाची एका महिलेनं 'करेक्टिव्ह सेक्स'वर डॉक्युमेंट्री करण्यासाठी रिसर्च सुरू केला. या रिसर्च दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना पुढे आली. आपल्या लेस्बियन बहिणीला सुधारण्यासाठी भावानंच रेप केल्याचा प्रकारही कळला.
मिळालेल्या माहितीनुसार अशा अनेक रिपोर्ट समोर आल्या आहेत. जिथं आपल्या समलैंगिक मुलींना सुधारण्यासाठी त्यांचे पालक भाऊ, चुलत भाऊ अशा घरातीलच व्यक्तीला तिच्यासोबत शारीरीक संबंध ठेवायला लावतात.
नुकत्याच एका इंग्रजी वृत्तपत्रात बातमी आली होती की, दिल्लीत काही डॉक्टर समलैंगिकता दूर करण्यासाठी वीजेचे झटके आणि हार्मोनल ट्रीटमेंटचा वापर करतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.