नवी दिल्ली : काश्मीरला स्वतंत्र करा, वेदप्रताप वैदीक यांचं पाकिस्तान वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दरम्यान, वेदप्रताप वैदिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय.
दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि 26-11 मुंबई हल्ल्यातील आरोपी हाफीज सईद याची मुलाखत घेतल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदीक यांनी काश्मीरबाबत वादग्रस्त विधान केलंय. काश्मिरबाबत भारतानं मन मोठं केलं पाहिजं, असं वक्तव्य त्यांनी पाकिस्तानमधील टीव्ही चॅनलल्या दिलेल्या मुलाखतीत केलंय. पाकव्याप्त काश्मिर आणि भारतातील काश्मीर अशा दोन्ही भागांना एकत्र करुन स्वतंत्र काश्मीरचा मुद्दा त्यांनी या मुलाखतीत मांडलाय. दोन्ही काश्मिर भागातील नागरिकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवाव्यात, असही मत त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केलंय. पाकिस्तानातील डॉन न्यूज वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वैदीक यांनी वादग्रस्त विधान केलंय.
ज्येष्ठ पत्रकार वेद प्रकाश वैदीक यांच्या दहशतवादी हाफिज सईदच्या मुलाखतीवरुन गदारोळ सुरु असतानाच आता वैदीक यांचं काश्मिरबाबत वादग्रस्त विधान समोर आलंय. काश्मिरला स्वतंत्र करा, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पाकीस्तानातील एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काश्मिरबाबत वादग्रस्त विधान केलंय. दोन्ही काश्मिरमधील नागरिकांनी एकत्र येत निवडणुका लढवाव्यात असही त्यांनी म्हटलंय. वैदीक यांनी हाफीजची भेट घेतल्याचं समर्थन केलं होतं.
तर वेदप्रताप वैदिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. तसंच वेदप्रताप वैदिक यांच्या काश्मीरसंदर्भातील मुद्दा संसदेत उठवणार असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.