नवी दिल्ली : तुम्हाला अर्थ मंत्रालयाकडून तुमच्या कर भरण्यासंदर्भात किंवा थकबाकी संदर्भात एखादा मेल आला असेल तर तो एकदा पडताळून नक्की पाहा...
कारण, केंद्रीय अर्थ मंत्रालायानं कर दात्यांना फसवणूक करणाऱ्या ई-मेलपासून सावधान राहण्याचं आवाहन केलंय. अनेक नागरिकांकडून असे ई-मेल मिळाल्याची तक्रार आल्यानंतर अर्थ मंत्रालयानं हा संदेश जाहीर केलाय.
‘करदात्यांना आयकर विभागाकडून काही ई-मेल्स मिळत आहेत, अशा सूचना मिळाल्या आहेत... ज्यामध्ये योग्य मिळकतीसंबंधीत फाईल डाऊनलोड करण्यासाठी सांगितलं जातंय’ हा मेल incometaxindia.gov.india@gmail.com या ई-मेल आयडीकडून पाठवण्यात येतोय.
परंतु, अशा प्रकारचा कोणताही मेल आयकर विभागाकडून किंवा अर्थ मंत्रालयाकडून कुणाच्याही ई-मेलवर पाठवण्यात आलेला नाही, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
अशा प्रकारचा ई-मेल कुणालाही आल्यास त्यांनी त्यामध्ये असलेली फाईल डाऊनलोड करू नये, कारण त्यामध्ये वायरसही असू शकतो, अशी सूचनाही मंत्रालयानं केलीय... तसंच या ई-मेलबाबत तत्काळ आयकर विभागाच्या राष्ट्रीय वेबसाईट www.incometaxindia.gov.in वर रिपोर्ट फिशिंग बटन दाबून याची तक्रीर नोंदवा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.