चंदीगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी हरयाणा सरकारने अनोखा निर्णय घेतलाय. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना सरकारी नोकरी दिली जाणार नसल्याचा निर्णय येथील सरकारने घेतलाय.
प्रत्येक घरात, सार्वजनिक ठिकाणी शौचालय बांधण्याचे आवाहन केल्यानंतर अद्यापही देशात अनेक ठिकाणी शौचालय बांधण्यात न आल्याने अजूनही लोक उघड्यावर शौचास जातात. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने ही योजना केली आहे.
जिल्हा ग्रामीण विकास संस्था (कुरुक्षेत्र)ने ब्लॉक को-ऑऱडिनेटर्स, क्लस्टर मोटिवेटर्स पदांच्या भरतीसाठीच्या जाहीरातीत या अटी ठेवल्या होत्या. नोकरीसाठी विद्यार्थ्यांना आपण उघड्यावर शौचास जाणार नाही असे लिहून देण्याची अट ठेवण्यात आली होती अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. सरकारी नोकरीसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.