नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवर प्रसारीत होणारा ‘मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणूक होईपर्यंत मोदी यांचा आकाशवाणीवर प्रसारीत होणारा ‘मन की बात' हा कार्यक्रम रोखण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.
अधिक वाचा : भाजपची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ४३ उमेदवारांची यादी जाहीर
मोदी दर महिन्यात रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमातून सरकारचे विविध उपक्रम आणि सुरू असलेल्या कामांविषयी माहिती देतात. तसेच ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांनाही प्राधान्य देतात. केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामांची माहिती या कार्यक्रमातून दिली जाते. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकीय प्रचार करत आहेत. त्यामुळे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग होतो, अशी तक्रार काँग्रेसने केली होती.
या कार्यक्रमावर बंदी घालणे शक्य नसल्याचे उत्तर आयोगाकडून काँग्रेसला देण्यात आलेय. बिहारमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.