निर्भया गँगरेप : अल्पवयीन दोषीला वेळेपूर्वीच सोडून दिलं

निर्भया गँगरेप प्रकरणातल्या अल्पवयीन दोषीला वेळेअगोदरच सोडण्यात आलंय. मीडिया रिपोर्टनुसार, या अल्पवयीन बलात्काऱ्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आलंय. 

Updated: Dec 19, 2015, 09:35 PM IST
निर्भया गँगरेप : अल्पवयीन दोषीला वेळेपूर्वीच सोडून दिलं title=

नवी दिल्ली : निर्भया गँगरेप प्रकरणातल्या अल्पवयीन दोषीला वेळेअगोदरच सोडण्यात आलंय. मीडिया रिपोर्टनुसार, या अल्पवयीन बलात्काऱ्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आलंय. 

सूत्रांच्या माहितीनुसार, या अल्पवयीन दोषीच्या जीवनाला धोका होवू शकतो, त्यामुळे त्याला शिक्षा पूर्ण होण्याच्या एक दिवस अगोदरच एका अज्ञात स्थळी हलवण्यात आलंय. 

दिल्लीत तीन वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणातला अल्पवयीन दोषी रविवारी २० डिसेंबरवा मोकाट सुटणार होता. दिल्ली हायकोर्टानं या गुन्हेगाराच्या मुक्ततेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानं त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. 

मात्र, मुदतीपूर्वीच आज संध्याकाळी या अल्पवयीन बलात्काऱ्याला अज्ञातस्थळी हलवण्यात आलं आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतल्या या अल्पवयीन दोषीच्या सुटकेच्या विरोधात दिल्लीत निदर्शनं करण्यात आली.