निर्भया बलात्कार प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा निर्णय सोमवारी होणार

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची सुटका होणारका याविषयी सुप्रिम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सुटका होणार नाही. 

Updated: Dec 20, 2015, 08:36 AM IST
निर्भया बलात्कार प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा निर्णय सोमवारी होणार title=

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची सुटका होणारका याविषयी सुप्रिम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सुटका होणार नाही. 

या सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख अल्पवयीन आरोपीच्या सुटकेला विरोध करत दिल्ली महिला आयोगानं शुक्रवारी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. महिला आयोगाच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य करत सरन्यायाधीशांनी ही कार्यवाही सुटीतील खंडपीठासमोर करण्याचे आदेश दिले होते. ही सुनावणी मध्यरात्री होईल अशी अपेक्षा होती मात्र आता ही सुनावणी सोमवारी होणार असल्याचं रात्री दोनच्या सुमारास स्पष्ट 

दरम्यान हे प्रकरण आता न्यायालयासमोर प्रलंबित असल्याने दिल्ली पोलीस आणि प्रशासनाने त्या गुन्हेगाराची आज सुटका करु नये या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच या संदर्भात कारवाई व्हावी अशी अपेक्षा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिलीय.