मुंबईसह देशभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत

मुंबईसह देशभरात नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्यासह देशभरातही नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.. गोवा, राजधानी दिल्ली, कोलकाता, भोपाळ याठिकाणी नववर्षाच्या स्वागताला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत.

Updated: Jan 1, 2017, 08:00 AM IST
मुंबईसह देशभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत title=

मुंबई : मुंबईसह देशभरात नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्यासह देशभरातही नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.. गोवा, राजधानी दिल्ली, कोलकाता, भोपाळ याठिकाणी नववर्षाच्या स्वागताला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत.

घड्याळात रात्री बाराचा ठोका पडला आणि एकच जल्लोश सुरु जाला. गुड बाय 2016... वेलकम 2017.. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अख्ख जग सरसावलं होतं. 

नव्या वर्षाच्या स्वागताचा हा जल्लोष जगभर रात्री उशिरापर्यंत सुरु होता..  फडाक्यांच्या आतशबाजीनं आकाश उजळून निघालं होतं. मुबंईत सीएसटी, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईँट आणि सी फेस या ठिकाणी घोळक्या घोळक्यानं तरुण तरुणींचा कल्ला सुरु होता. 

आकर्षक विद्युत रोषणाईनं सारं शहर नटून गेलं होतं. शहरातील सोसायट्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत.. पब, डिस्को खचाखच भरले होते.. सेल्फी आणि डान्सच्या मस्तीत मुंबईतली तरुणाई हरवून गेली होती.