पासपोर्ट देखील बदलणार, पासपोर्टमध्ये येणार चीप

फेब्रुवारीनंतर पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. पासपोर्ट बनवतांना येणाऱ्या अनेक अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भविष्यात पासपोर्टमध्ये मायक्रो चीप देखील असणार आहे. लवकरच ई-पासपोर्ट दिले जाणार आहे.

Updated: Nov 15, 2016, 05:44 PM IST
पासपोर्ट देखील बदलणार, पासपोर्टमध्ये येणार चीप title=

नवी दिल्ली : फेब्रुवारीनंतर पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. पासपोर्ट बनवतांना येणाऱ्या अनेक अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भविष्यात पासपोर्टमध्ये मायक्रो चीप देखील असणार आहे. लवकरच ई-पासपोर्ट दिले जाणार आहे.

पासपोर्टमध्ये एक मायक्रो चीप असणार आहे. ज्याच्या मदतीने कंप्यूटरमध्ये सगळी माहिती मिळणार आहे. बनावट पासपोर्टला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. बनावट पासपोर्टच्या मदतीने भारताबाहेर निघता येतं पण परदेशात ते पकडले जातात. बनावट पासपोर्ट बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार एक वेगळी टीम तयार करणार आहे.

बनावट पासपोर्ट बाळगणाऱ्यांवरही कठोर कारवाई होणार आहे. पासपोर्ट बनवतांना पोलीस वेरिफिकेशनमध्ये अनेक वेळ जातो त्यामुळे तो कमी करण्यासाठी देखील पासपोर्ट ऑफीस काम करतंय. येणाऱ्या काळात काही तासांमध्ये पोलीस वेरिफिकेशन होणार आहे.

आयडी आणि स्कॅन केलेले कागदपत्र आता ऑनलाइन साईटवरच सबमिट करता येणार आहे. पासपोर्ट देखील आधार कार्डसोबत लिंक होणार आहे.