नवी दिल्ली : विमानात गैरवर्तन करण्याला आता लगाम बसमार आहे. गैरवर्तन करणा-यांना कठोर शिक्षा होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवे नियम लागू होणार आहेत.
विमानातील बेशिस्त प्रवाशांना लगाम लावण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केलीय. बेशिस्त प्रवाशांना रोखण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नये नियम लागू केले आहेत. या नियमानुसार विमान प्रवासात गैरवर्तन करणा-यांना कठोर शिक्षणा होणार आहे.
या शिक्षेचे तीन गट तयार करण्यात आलेत. विमान प्रवासात प्रवाशांना धक्काबुक्की करणे, छेडछाड, लैंगिक अत्याचार, शिवीगाळ करणे अशा विविध गोष्टी शिक्षेला पात्र ठरतील. नव्या नियमांमध्ये 3 महिन्यांपासून ते 3 वर्षांपर्यंतच्या प्रवास बंदीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलीय.