देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जिवंत होते सुभाष चंद्र बोस?

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारनं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स सार्वजनिक करण्याची तयारी दर्शवलीय. यापूर्वी नेताजींच्या तायवानमध्ये १९४५ ला प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाल्याचा वाद पुन्हा एकदा सुरू झालाय.

Updated: Sep 16, 2015, 05:07 PM IST
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जिवंत होते सुभाष चंद्र बोस? title=

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारनं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स सार्वजनिक करण्याची तयारी दर्शवलीय. यापूर्वी नेताजींच्या तायवानमध्ये १९४५ ला प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाल्याचा वाद पुन्हा एकदा सुरू झालाय.

इंग्रजी वर्तमान पत्र द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार अमेरिकन आणि ब्रिटिश गुप्तचर विभागाचं म्हणणं आहे की, १९४८-४९ दरम्यान नेताजी जिवंत होते. त्यावेळी दक्षिण आशियात कम्युनिस्ट आंदोलनांना पुढे चालू ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

आणखी वाचा - सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ कायम 

रिपोर्टनुसार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागात आह्यू हियन कुआननं नेताजींचा पुतण्या अमिय नाथ बोस यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात १९४८ मध्ये अमिय नाथ बोस यांना सुद्धा ही माहिती होती. त्या पत्रात लिहिलं होतं की, 'मला वाईट वाटतं की मी नेताजींबद्दल ती बातमी शोधू शकलो नाही. जी चीनी पत्रात काही काळापूर्वी छापून आली होती. पण मला पूर्ण विश्वास आहे की ते अजूनही जिवंत आहे.'

नेताजींवरील या फाईल्सची संख्या जवळपास ६४ आहे. या फाईल्स १९३७ ते १९४७ दरम्यानच्या आहेत. ज्याचा खुलासा बंगाल सरकारकडून शुक्रवारी केला जाणार आहे. यात अनेक फाईल्स ३०० पानांच्या आहेत आणि त्यावर हस्तलिखित नोट्स आहेत. यातील अधिकाधिक फाईल्स नेताजी आणि त्यांचे मोठे भाऊ शरतचंद्र बोस यांच्या दरम्यान झालेले वैयक्तिक पत्र व्यवहार आहेत.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये नरेंद्र मोदी सरकारनं एका आरटीआयच्या उत्तरात सांगितलं होतं की, नेताजींच्या मृत्यूशी निगडित कोणतेही रेकॉर्ड प्रकाशित केले जावू शकत नाहीत. 

आणखी वाचा - नेताजींसंबंधित कागदपत्रं खुली करावीत? समिती नेमली

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.