वेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करणार महिला आयोग

राष्ट्रीय महिला आयोग वेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करण्याची शक्यता आहे. कारण महिला आयोगाच्या प्रमुख्य ललिता कुमारमंगलम देशातील सेक्स वर्कर्सचं आयुष्य सुसह्य बनविण्यासाठी प्रयत्न करतायेत. महिला आयोग याप्रकरणी हायकोर्टाद्वारे बनवण्यात आलेल्या समितीसमोर ८ नोव्हेंबरला आपल्या शिफारशी ठेवणार आहेत.  

PTI | Updated: Nov 1, 2014, 09:22 AM IST
वेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करणार महिला आयोग title=

नवी दिल्ली: राष्ट्रीय महिला आयोग वेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करण्याची शक्यता आहे. कारण महिला आयोगाच्या प्रमुख्य ललिता कुमारमंगलम देशातील सेक्स वर्कर्सचं आयुष्य सुसह्य बनविण्यासाठी प्रयत्न करतायेत. महिला आयोग याप्रकरणी हायकोर्टाद्वारे बनवण्यात आलेल्या समितीसमोर ८ नोव्हेंबरला आपल्या शिफारशी ठेवणार आहेत.  

ललिता कुमारमंगलम म्हणाल्या, 'वेश्याव्यवसायाला कायदेशीर केल्यानं सेक्स वर्कर्स चांगलं जीवन जगू शकण्यास मदत होईल. मात्र व्यापारात काय कायदेशीर आणि काय बेकायदेशीर याबद्दल विविध तर्कवितर्क आहेत. त्यावर विचार करण्यात येतोय.'

हायकोर्टानं २४ ऑगस्ट २०११मध्ये एक समिती नेमली होती. ही समिती सेक्स वर्कर्सचं पुनर्वसनसाठी २०१०मध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेनंतर स्थापित करण्यात आली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.