www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अधिक प्रशासन आणि कमी सरकार आपल्या मंत्राचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याच्या कामगिरीनुसार इनसेंटीव्ह (प्रोत्साहन भत्ता) देण्याची योजना लागू करू शकतात.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग लवकरच पंतप्रधानांसमोर कामगिरी आधारित इन्सेंटीव्ह स्कीम (पीआरआयएस) संदर्भात सखोल प्रेसेंटेशन करणार आहे.
डीओपीटीनेसुद्धा सहाव्या वेतन आयोगावर शिफारस केली होती. त्याला यूपीए सरकारने ही शिफारस मान्य केली होती.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसंदर्भात लागू होणार धोरण
यूपीए सरकारमध्ये पीआरआयएस लागू करता येणे शक्य नव्हते, पण मागील सरकारने आपली मंजुरी दिली होती. प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी डीओपीटी हा प्रस्ताव पंतप्रधानांसमोर ठेवणार आहे.
पंतप्रधानांनी याला मंजुरी दिल्यानंतर आदेश देण्यात येतील, त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना इन्सेटिव्ह देण्यात येणार आहे. सध्या देशात ५० लाख केंद्रीय कर्मचारी आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.