नारायण साईचे ८ महिलांशी शारीरिक संबंध

आसामार बापू यांचा मुलगा नारायण साई यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. माझे ८ महिलांशी संबंध होते, अशी कबुली पोलीस तपासात नायायणने दिली आहे. हे संबंध त्यांच्या सहमतीने ठेवले होते, असा खुलासाही साईने केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 11, 2013, 01:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सुरत
आसामार बापू यांचा मुलगा नारायण साई यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. माझे ८ महिलांशी शारीरिक संबंध होते, अशी कबुली पोलीस तपासात नायायणने दिली आहे. हे संबंध त्यांच्या सहमतीने ठेवले होते, असा खुलासाही साईने केलाय.
नारायण साईला सुरत न्यायालयात आज हजर करण्यात आले. त्यावेळी ही आठ महिलांशी संबंध असल्याची कबुली केली. नारायणला ११ दिवशांची न्यायालयीन कोठडी संपली. सूरतमधील दोन बहिणींनी नारायण साई आणि त्याचे वडील आसाराम यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर ६ ऑक्टोबर २०१३ रोजी नारायण साई विरोधात गुन्हा दाखल केला गेला होता.
बलात्काराच्या आरोपानंतर नारायण साई दोन महिने फरार होता. त्याला दिल्ली आणि सुरत पोलिसांनी संयुक्त कामगिरी करत कुरूक्षेत्रजवळील पीपली येथून ४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.