तिरुपती : प्रख्यात बालाजी मंदीराची देखरेख करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानानं (टीटीडी)नं केवळ वर्ष २०१५ साठी डायरी आणि कॅलेंडर विकून तब्बल १५ करोड रुपयांची कमाई केलीय.
टीटीडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०१५ साठी बनवण्यात आलेल्या डायरी आणि कॅलेडर्स विक्रीमध्ये पारदर्शकता बाळगली होती. टीटीडी व्यवस्थापनाच्या वेबसाईटवरही हे उपलब्ध आहेत.
डिसेंबर २०१४ च्या दुसऱ्या आठवड्यात २० लाख कॅलेंडर्स आणि ६ लाख डायऱ्यांची छपाई करून टीटीडीच्या सगळ्याच स्टॉल्सवर त्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याच्या प्रत्येक कॅलेंडरची किंमत होती १०० रुपये...
व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार, ४० दिवसांच्या आत कॅलेंडर्स आणि डायरीच्या सगळ्या प्रती विकल्या गेल्या. यामधून एकूण १५ करोड रुपयांची कमाई झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.