भारतीय झेंडा साकारून पाकिस्तानचा रेकॉर्ड मोडीत

सोमवारी 'फ्लॅग डे' साजरा करण्यात आला यावेळी, चेन्नईत एक मानवी साखळी करून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही करण्यात आला. मानवी साखळी तयार करून पन्नास हजार लोकांनी भारतीय ध्वज साकारला.

Updated: Dec 9, 2014, 07:16 PM IST
भारतीय झेंडा साकारून पाकिस्तानचा रेकॉर्ड मोडीत title=
सौजन्य - न्यूज ७

चेन्नई : सोमवारी 'फ्लॅग डे' साजरा करण्यात आला यावेळी, चेन्नईत एक मानवी साखळी करून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही करण्यात आला. मानवी साखळी तयार करून पन्नास हजार लोकांनी भारतीय ध्वज साकारला.

 चेन्नईतील एका न्यूज चॅनेलने या कार्यक्रम घडवून आणला, यात 50 हजार जण सामिल झाले होते, या आधी हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावे होता, पाकिस्तानने जवळपास 29 हजार लोकांच्या मदतीने ध्वज साकारला होता. यामुळे पाकिस्तानचा हा रेकॉर्ड आता मोडीत निघाला आहे.

50 हजार लोकांना घेऊन ध्वज साकारणे सोपी बाब नव्हती हे हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.