हिंदू मित्राला दिला मुस्लिम मित्राने मुखाग्नी

आतापर्यंत तुम्ही मैत्रीसाठी काही करणाऱ्या मित्रांचे किस्से ऐकले असतील पण एखाद्या मुस्लिम मित्राने एखाद्या हिंदू मित्रांचा अंत्यसंस्कार केल्याचं ऐकलं आहे का. मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात अब्दुल रज्जाक याने आपला मित्र संतोष सिंह ठाकूर याचे हिंदू रिती-रिवाजप्रमाणे अंत्यसंस्कार करून आपली सच्ची मैत्री दाखवून दिली. 

Updated: Sep 22, 2015, 05:01 PM IST
हिंदू मित्राला दिला मुस्लिम मित्राने मुखाग्नी title=

भोपाळ : आतापर्यंत तुम्ही मैत्रीसाठी काही करणाऱ्या मित्रांचे किस्से ऐकले असतील पण एखाद्या मुस्लिम मित्राने एखाद्या हिंदू मित्रांचा अंत्यसंस्कार केल्याचं ऐकलं आहे का. मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात अब्दुल रज्जाक याने आपला मित्र संतोष सिंह ठाकूर याचे हिंदू रिती-रिवाजप्रमाणे अंत्यसंस्कार करून आपली सच्ची मैत्री दाखवून दिली. 

गेल्या १२ दिवसांपासून आजारीही होता संतोष 

संतोष आणि रज्जाक एक घनिष्ठ मित्र... त्याच्या मैत्रीत धर्म कधी आला नाही. रज्जाक ऑटो रिक्षा चालतो तर संतोष मोल मजुरी करायचा. दोन्ही सोनाघाटी भागात राहायला आहेत. संतोषची तब्येत गेल्या १२ दिवसांपासून खराब होती. त्याला टीबी आणि कावीळ झाली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर रविवारी सकाळी संतोषचा मृत्यू झाला. 

जनआस्थाने केली अंत्यसंस्काराची व्यवस्था
संतोष आणि रज्जाक यांची आर्थिक स्थिती खराब होती. रज्जाक अत्यंसंस्काराचा खर्च उचलू शकत नव्हता. संतोषची पत्नी आणि रज्जाक यांना वाटत नव्हते की संतोषला बेवारस सारखे दफन केले जावे. त्यानंतर डॉ. रूपेश पद्माकर यांच्या मदतीने जनआस्था संघटनेने अंत्यविधीची व्यवस्था केली. 

रज्जाकने दिला मित्राला मुखाग्नी
संतोषच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था झाल्यावर प्रश्न होता कोण देणार मुखाग्नी... संतोषचा मुलगा नव्हता. नातेवाईक पण नव्हते. त्यामुळे रज्जाकने आपल्या मित्राला मुखाग्नि देण्याचे ठरविले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.