मुंबई ते अहमदाबाद प्रवास २ तासांचा होणार

मुंबई ते अहमदाबाद हा रेल्वे प्रवास जवळ-जवळ सात तासांचा आहे, मात्र हा प्रवास फक्त दोन तासाचा होणार आहे. हा कोणताही कल्पना विलास नाही, कारण जपाने पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाच बुलेट ट्रेनच्या प्रॉजेक्टविषयी चर्चा झाली होती.

Updated: Dec 7, 2015, 06:33 PM IST
मुंबई ते अहमदाबाद प्रवास २ तासांचा होणार title=

नवी दिल्ली : मुंबई ते अहमदाबाद हा रेल्वे प्रवास जवळ-जवळ सात तासांचा आहे, मात्र हा प्रवास फक्त दोन तासाचा होणार आहे. हा कोणताही कल्पना विलास नाही, कारण जपाने पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाच बुलेट ट्रेनच्या प्रॉजेक्टविषयी चर्चा झाली होती.

या हायस्पीड बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३०० किलोमीटर आहे. सध्या देशात सर्वात वेगाने धावणारी एक्स्प्रेस ही गतिमान एक्स्प्रेस आहे, या ट्रेनचा वेग १६० किमी प्रतितास आहे, ही गाडी आग्रा ते दिल्ली दरम्यान धावते, तशीच दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्सप्रेस आहे, या गाडीचा वेग प्रतितास १५० किलोमीटर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान दौऱ्यावर होते, त्यावेळी जपानची कंपनी आणि भारत सरकार यावर संयुक्तपणे काम करणार आहेत.
जपानहून आलेल्या एका टीमने मुंबई-अहमदाबाद या ५०५ किलोमीटर अंतराचं सर्वेक्षण केलं आहे. यावरून हा रूट आर्थिक तसेच तांत्रिक दृष्ट्या व्यवहार्य असल्याचं जपानहून आलेल्या टीमने म्हटलं आहे.

जपानच्या सरकारने या प्रोजेक्टविषयी कोणताही गैरसमज भविष्यात होणार नाही, यासाठी किती पैसा लागेल याचा अंदाज दिला जाणार आहे, तसेच तंत्रज्ञानही पुरवलं जाणार आहे. यात कुशल कामगार, उभारणीसाठी तसेच देखभाल करण्यासाठी चांगली यंत्र सामुग्री यांचा समावेश असणार आहे. हा प्रोजेक्ट २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असं म्हटलं जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.