'मदर तेरेसा मूर्ख, विश्वासघातकी आणि धर्मांध होत्या'

वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या लेखिका तसलिमा नसरीन यावेळी पुन्हा एकदा वादात अडकल्यात त्या त्यांनी मदर तेरेसा यांच्यावर केलेल्या आपल्या विधानांमुळे... 

Updated: Feb 25, 2015, 06:41 PM IST
'मदर तेरेसा मूर्ख, विश्वासघातकी आणि धर्मांध होत्या' title=

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या लेखिका तसलिमा नसरीन यावेळी पुन्हा एकदा वादात अडकल्यात त्या त्यांनी मदर तेरेसा यांच्यावर केलेल्या आपल्या विधानांमुळे... 

मोहन भागवत यांनी मदर तेरेसांबद्दल नुकत्याच केलेल्या वादग्रस्त विधानांचं समर्थन करत तसलिमा नसरीन यांनी काही गंभीर आरोप केलेत. 

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नसरीन यांनी मदर तेरेसा यांना 'विश्वासघातकी' आणि 'धर्म-कट्टर' म्हटलंय.    

' मदर तेरेसा या फसव्या आणि धर्मांध होत्या. गरिबी आणि दु:ख त्यांच्यासाठी अध्यात्मिक गोष्टी होत्या. दु:ख आणि भोग ही देवाची देणगी आहे असं त्या म्हणत होत्या.... मदर तेरेसा यांची गरिबांशी नाही तर 'गरिबी'शी मैत्री होती. त्यांनी गरिबांना गरीबच ठेवलं' असं तसलिमा नसरीन यांनी म्हटलंय. 

याशिवाय, आपण १९७५ साली आंध्र ज्योती या तेलगु दैनिकासाठी काम करत असताना आपण त्यांची हैदराबाद मुलाखत घेतली होती. तेव्हा त्या आपल्याला मूर्ख वाटल्या होत्या, असंही नसरीन यांनी म्हटलंय.  

तसलिमा नसरीन यांचं ट्विट... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.