हैदराबाद : तिरुपती येथील विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला एका खासदाराने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. मारहाण करणारे खासदार पी. एम. रेड्डी यांना आज या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
तिरुपती विमानतळावर रेड्डी यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यास थोबाडीत मारली होती. २६ नोव्हेंबर २०१५ रोजी हे प्रकरण घडलं होतं. रेड्डी यांच्यावर आज गुन्हा नोंदविण्यात आला. रेड्डी हे जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाचे कडप्पा मतदारसंघाचे खासदार आहेत.