नवी दिल्ली : नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांचं कार्य महान होतं. पण त्यांनी धर्मांतरासाठी त्याचा उपयोग केला, असं वक्तव्य आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. भागवत यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.
आपले मंदिर बांधल्यानंतर आणि देशभरात 'घर वापसी'वरुन मोठा वाद झाल्याने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याबाबत फटकारलं असताना आता खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे वादळ उठलं आहे. मोहन भागवत तीन दिवसांच्या भरतपूर दौऱ्यावर आहेत. भरतपूर इथल्या 'अपना घर' या ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात भागवत बोलत होते.
मोहन भागवतांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर जेडीयू नेते अली अन्वर यांनी टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी अजब विधान केले आहे. देशातल्या सगळ्या नागरिकांनी योगासनं केल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असा तर्क मुरली मनोहर जोशी यांनी लावला आहे. मुरली मनोहर जोशी एवढ्यावरच थांबले नाहीत. मुस्लिम बांधव दिवसातून पाच वेळा योगासनं करतात आणि मोहम्मद पैगंबर महान योगी होते,असंही त्यांनी म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.