आग्रा : ताजमहल केवळ आपल्या सौंदर्यासाठी नाही तर आपल्या कमाईच्या बाबतीतही देशातील इतर स्मारकांच्या बाबतीत नंबर १ वर आहे.
१) केंद्र सरकारच्या अख्यारित एकूण ११ स्मारक आहेत. त्यांचे संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्या ठिकाणी एन्ट्री तिकीट घेतले जाते.
२) २०१४-१५ या कालवधीत एन्ट्री फी म्हणून या स्मारकांमार्फत ९३.३८ कोटींची कमाई झाली.
३) २१.२४ कोटींची कमाई केवळ एकट्या ताजमहालकडून झाली आहे.
४) देशात एन्ट्री फीने कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये ६५ टक्के मुघलांनी बनविलेले आहेत.
५) सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये ताजमहाल क्रमांक एक त्यानंतर दुसऱ्या स्थानावर आग्र्याचा किल्ला, तिसऱ्या स्थानावर कुतूबमिनार, चौथ्या स्नावर हुमायूचा मकबरा, पाचव्या स्थानावर फतेहपूर सिकरीचा समावेश आहे.
६) गेल्या एप्रिलमध्ये स्मारकांची एन्ट्री फी १५ वर्षांनंतर वाढविण्यात आली आहे.