फ्रान्समध्ये १६० मशीदींना लागणार टाळे?

पॅरिसमध्ये इसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समधील १६० मशीदी पुढील काही महिन्यांसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील दोन मशीदींवर घालण्यात आलेल्या छाप्यामधून जेहादी दस्तावेज हस्तगत करण्यात आले. यामुळे या मशीदी बंद ठेवण्यात येणार आहेत. 

Updated: Dec 4, 2015, 12:22 PM IST
फ्रान्समध्ये १६० मशीदींना लागणार टाळे? title=

नवी दिल्ली : पॅरिसमध्ये इसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समधील १६० मशीदी पुढील काही महिन्यांसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील दोन मशीदींवर घालण्यात आलेल्या छाप्यामधून जेहादी दस्तावेज हस्तगत करण्यात आले. यामुळे या मशीदी बंद ठेवण्यात येणार आहेत. 

छापा घालण्यात आलेल्या मशीदींमधून सुरक्षा अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणा जिहादाचा प्रसार करण्यासाठी वापरली जाणारी साधने सापडली. गेल्या दोन आठवड्यात तीन मशीदींना टाळे ठोकण्यात आलेय. फ्रान्समध्ये आतापर्यंत दोन हजार २५३ घरांवर छापे टाकण्यात आलेत. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात १०० ते १६० मशीदींकडे परवाने नाहीत. यांना बंद केले जाणार आहे. 

गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात तब्बल १३० निरपराध जीवांचा बळी गेला होता. याप्रकऱणी आतापर्यंत २००हून अधिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.