देशाची होणार दूष्काळाच्या समस्यापासून सूटका?

Updated: Jul 21, 2014, 06:17 PM IST
देशाची होणार दूष्काळाच्या समस्यापासून सूटका? title=

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे, असं झाल्यास मध्य भारत, बिहार, बंगाल, झारखंड या दूष्काळाचं सावट असलेल्या राज्यांवर लवकरच जोरदार वर्षाव होणार आहे.
 
हवामान खात्यानं मान्सून सूरू होण्यापूर्वी शंका व्यक्त केली होती की, यावर्षी पाऊस कमी राहील. पण आता बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यानं दूष्काळाचं भय निश्चितच कमी होणार आहे. अशाप्रकारे जर चांगला पाऊस तर यावर्षी दूष्काळाचं प्रमाण 20 टक्के राहू शकतं.

काही भागात पाऊस झाल्यामुळं आनंद व्यक्त होतोय, तर काही भागात पावसामूळं अडचणींचा सामना करावा लागतोय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तराखंडात स्थानिक लोकांसाठी आणि तीर्थयात्रेला गेलेल्या भाविकांसाठी हवामान योग्य नसेल. इथं काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे.

त्यामुळं ज्या राज्यातील शेतकऱ्यांना आणि सामान्य लोकांना पावसाची प्रतिक्षा होती त्यांना आता दूष्काळाची भिती बाळगण्याची गरज नाही, कारण येत्या काही दिवसातच जोरदार पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.