अल्पवयीवर रेप, विहीरीत ढकललं, १५ तास लटकली मोटरीला

 राजस्थानमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजाऱ्याने बलात्कार केला आणि तिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडित मुलीने सुमारे १५ तास विहीरीतील पाण्याच्या मोटरीला धरून आपला जीव वाचविला. दुसऱ्या दिवशी सकाळी आसपासच्या लोकांनी तिला वाचविले. 

Updated: Jul 22, 2014, 07:35 AM IST
 अल्पवयीवर रेप, विहीरीत ढकललं, १५ तास लटकली मोटरीला title=

भीलवाडा :  राजस्थानमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजाऱ्याने बलात्कार केला आणि तिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडित मुलीने सुमारे १५ तास विहीरीतील पाण्याच्या मोटरीला धरून आपला जीव वाचविला. दुसऱ्या दिवशी सकाळी आसपासच्या लोकांनी तिला वाचविले. 

ही घटना भीलवाडा शहरात घडली. अल्पवयीन मुलगी शेतात काम करायला गेली होती, ज्यावेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तिला विहिरीजवळ घेऊन गेला आणि हत्या करण्याच्या उद्देशाने तिला विहिरीत ढकलून दिले.

रात्रभर ती पीडित मुलगी विहिरीत पाण्याचा मोटरीला धरून जिवंत राहिली. सकाळी मुलीने आरडाओरडा केला तेव्हा तिला वाचविण्यात आले. आरोपी फरार असून त्याच्या विरोधात रेप आणि हत्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. 

पीडित मुलीने सांगितले, की ती संपूर्ण रात्र त्या पाण्यात होती. ती संपूर्ण रात्र मदतीसाठी ओरडत होती. पण भरपूर पावसामुळे तिचा आवाज कोणी ऐकला नाही. बुडण्यापासून वाचण्यासाठी तिने विहिरीत असलेल्या पाण्याच्या मोटरीला धरून ठेवले होते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.