मोदींच्या हस्ते देशातील सर्वात लांब बोगद्याचं आज लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन करणार आहेत. 9.2 किलोमीटर लांब चनैनी-नाशरी बोगदा जम्मूच्या उधमपूरमध्ये बनवला गेलाय. 

Updated: Apr 2, 2017, 08:20 AM IST
मोदींच्या हस्ते देशातील सर्वात लांब बोगद्याचं आज लोकार्पण title=

जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन करणार आहेत. 9.2 किलोमीटर लांब चनैनी-नाशरी बोगदा जम्मूच्या उधमपूरमध्ये बनवला गेलाय. 

2500 कोटी रुपयांच्या खर्चातून हा बोगदा तयार करण्यात आलाय. या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील 31 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. बर्फवृष्टीमुळे तुटणारा संपर्कही या बोगद्यामुळे सुटणार आहे. 

बोगद्याच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी बट्टल बालियानच्या रॅलीत सहभागी होणार आहेत.