www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लवकरच देशातील जनतेला करामध्ये सवलत मिळू शकते. कारण भाजपने त्यांच्या वचननाम्यात कर सवलतीबाबत वचन दिलं होत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, `एकाचं प्रकाराचा कर आकारला जाईल जो जनतेसाठी सुखद धक्का असेल. असे एका आर्थिक वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.
मात्र, सध्या सरकारची आर्थिकस्थिती फारच खराब आहे. तरीही सरकार महागाईग्रस्त जनतेला काहीसा दिलासा देईल, अशी आशा आहे. यामध्ये खासकरुन मध्यमवर्गीयांच्या करामध्ये सवलत देण्याची शक्यता एका वृत्तसंस्थेने वर्तवली आहे. तसेच सरकारकडे महसूल कमीची समस्यापण आहे आणि करात सूट देण्यासाठी कर वसूल करण्यावर जोर द्यावा लागेल. सेक्शन ८० सी अंतर्गत कर सवलत मर्यादा वाढवली जाईल. याचा फायदा जनतेलाच होईल.
भविष्यात नवीन सरकार कर सवलतीत २ लाख रुपयांची मर्यादा वाढवून अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत करू शकते. तसेच सेक्शन ८० सी मध्ये १ लाख रुपयांच्या मर्यादीत अडीच ते तीन लाख रुपयांची वाढ होऊ शकते. निवृत्ती योजनेत एक लाख रुपये वाढ होऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.