मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशाह नाहीत; सोनियांचा हल्लाबोल

लंडनमध्ये बेनामी संपत्तीच्या प्रकरणात अडकलेल्या आपल्या जावयाच्या मदतीसाठी आता खुद्द सोनिया गांधी धावून आल्यात. रॉबर्ट वडेरा यांचा बचाव करतानाच सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. 

Updated: May 31, 2016, 05:33 PM IST
मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशाह नाहीत; सोनियांचा हल्लाबोल title=

नवी दिल्ली : लंडनमध्ये बेनामी संपत्तीच्या प्रकरणात अडकलेल्या आपल्या जावयाच्या मदतीसाठी आता खुद्द सोनिया गांधी धावून आल्यात. रॉबर्ट वडेरा यांचा बचाव करतानाच सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. 

वडेरांचा बचाव

'नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत... शहेनशाह नाही... त्यांना जनतेशी काहीही घेणं देणं नाही... शेतकरी दुष्काळात आपले प्राण गमावत असताना मोदी आपल्या सत्तेची दोन वर्ष साजरी करत आहेत...' असं म्हणतानाच 'रॉबर्ट वडेरा यांना कट करून फसवलं जातंय... जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्याची चौकशी व्हावी. चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करावं' असं सोनियांनी म्हटलंय.

काँग्रेसविरुद्ध कट 

भाजपच्या 'काँग्रेस मुक्त भारत' अभियानाचाच हा एक भाग आहे. काँग्रेस मुक्त भारताचा अर्थ काय? यासाठी ते दररोज काही ना काही निमित्त शोधून काढत आहेत. चुकीचे आरोप केले जात आहेत. जर काही काळंबेरं असेलच तर त्याची भेदभावाशिवाय सरळ चौकशी का करत नाहीत? असं म्हणत सोनियांनी आपला राग व्यक्त केलाय. 

उल्लेखनीय म्हणजे, सोनिया गांधींचा जावई रॉबर्ट वडेरा यांच्यावर लंडनमध्ये बेनामी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात चौकशी समितीनं सौदेबाजी करणाऱ्या संजय भंडारीवरही फास आवळलाय.