पाटणा : आता, तुम्ही एखाद्या मुलीला किंवा महिलेला तुमच्या मोबाईलवरून मिस्ड कॉल दिला तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.
बिहारमध्ये सगळ्या पोलिसांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्यात. सीआयडी महानिरीक्षक अरविंद पांडे यांच्या म्हणण्यानुसार, सगळ्या जिल्हा पोलीस अधिक्षकांना, सरकारी रेल्वे पोलिसांच्या अधिक्षकांना याबाबतच्या सूचना देऊन अशा प्रकरणांची चौकशी करण्याची आणि कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलांना वारंवार मिस्ड कॉल देऊन त्यांना त्रास देणं हा गंभीर गुन्हा आहे. यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळेच, अशा प्रकरणांत आरोपीवर आयपीसी कलम 354 डी एक आणि दोन नुसार पाठलाग करण्याच्या गुन्ह्याची नोंद करण्याचा निर्णय घेतलाय.
एक-दोन वेळेस मिस्ड कॉल असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता येईल, मात्र एखाद्या महिलेला त्रास देण्याच्या हेतूने वारंवार मिस्ड कॉल दिले जात असतील, तर नक्कीच कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.