मॉर्निंग वॉकला निघालेल्या विद्यार्थिनीचं अपहरण करून बलात्कार

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरलीय. गँगरेपच्या घटनेनं दिल्लीत खळबळ माजलीय, स्थानिक नागरिकही या घटनेनं हादरून गेलेत. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या अमन विहार भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून दोघांनी बलात्कार केला.

Updated: Sep 14, 2015, 04:45 PM IST
मॉर्निंग वॉकला निघालेल्या विद्यार्थिनीचं अपहरण करून बलात्कार title=

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरलीय. गँगरेपच्या घटनेनं दिल्लीत खळबळ माजलीय, स्थानिक नागरिकही या घटनेनं हादरून गेलेत. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या अमन विहार भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून दोघांनी बलात्कार केला.

अमन विहारमध्ये ११व्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी मॉर्निंग वॉकला गेली होती. तेव्हा तिचं अपहरण करून दोघांनी एका घरात डांबलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

आणखी वाचा - मुंबई पुन्हा हादरली, २० वर्षीय तरुणीवर गँगरेप

खूप वेळ झाला मुलगी परतली नाही म्हणून आई-वडिलांनी तिचा शोध घ्यायला सुरूवात केली. परिसरातील लोकही मदतीला आले. आरोपी मोहम्मद आणि नौशाद आपल्या घरी मुलीला घेऊन गेले होते. बलात्कार केल्यानंतर तिचे हात-पाय आणि तोंड बांधून हे दोघं बाहेर निघून गेले. तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या लोकांना थोडा संशय आला. कारण घराला बाहेरून टाळं होतं, पण घरातील लाईट ऑन होते. 

त्यानंतर शेजाऱ्यांनी नौशादच्या घराचा दरवाजा तोडला. तर पीडित मुलगी सापडली. घर नौशादनं भाड्यानं घेतलं होतं. शेजाऱ्यांनी दोन्ही आरोपींना पकडलं आणि त्यांची चांगलीच धुलाई केली. आरोपींचे अर्धे केस कापून त्यांना संपूर्ण परिसरात फिरवलं गेलं. नंतर आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केलीय. 

आणखी वाचा -  दिल्लीत कामासाठी आलेल्या नेपाळी माय-लेकीवर बलात्कार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.