www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
होळीच्या दिवशी आणि तेही विमान उडतांना विमानात केलेला डांस स्पाइसजेटला चांगलाच महागात पडलाय. गोवा ते बंगळुरू जाणाऱ्या फ्लाईटचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर नागरी विमानन नियमननं (डीजीसीए) स्पाइसजेट एअरलाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावलीय. आपलं लायसंस रद्द का करू नये? असा सवाल यात विचारण्यात आलाय.
स्पाइसजेटनं यानंतर कारवाई करत दोषी पायलटसा निलंबित केलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप फिरतोय. ज्यात विमानातील सदस्य एका गाण्यावर थिरकतांना दिसतायेत... ते ही फ्लाईट उडत असतांना...
सोमवारी होळीच्या दिवशी स्पाइसजेटच्या केबिन क्रूनं प्रवासादरम्यान ‘ये जवानी है दिवानी’ य़ा चित्रपटातील बलम पिचकारी या गाण्यावर डांस केला. मोबाईलनं घेतलेला हा व्हिडिओ आता यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया वेबसाईटवर वायरस झालाय.
पुरावा म्हणून व्हिडिओचा वापर केला जाणार आहे. डीजीसीएनं आपल्या नोटीशीत म्हटलंय की, केबिन क्रूच्या या वागणुकीमुळं इतर लोकांवरही याचा परिणाम होईल. विमानात डांस केल्यानं विमानातील इतर प्रवाशांच्या जीवाला धोका होता. विमान कंपनीला नोटीशीचं उत्तर देण्यासाठी १५ दिवसांचा वेळ देण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.