दिल्ली : उत्तर प्रदेशात भाजपाच्या दिग्विजयानंतर लगेचच राजधानी दिल्लीमध्ये पक्षाची लिटमस टेस्ट होणार आहे.
दिल्लीमधल्या तीनही महापालिकांच्या निवडणूक तारखा जाहीर करण्यात आल्यात. त्यानुसार 22 एप्रिल रोजी मतदान होईल, तर 25 तारखेला मतमोजणी होणार आहे.
भाजपाबरोबरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही कसोटी पाहणारी, ही निवडणूक असेल. विधानसभेत पाशवी बहुमत मिळाल्यानंतर 'आम आदमी पार्टी'ची दिल्लीकरांवर जादू कायम आहे? की त्यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झालीय? याचा फैसला या निवडणुकीत होईल.
दरम्यान, आपला मतदान यंत्रांवर विश्वास नसून मतपत्रिकेतून मतदान घेण्याची मागणी केजरीवाल यांनी केलीय. ही मागणी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनीही उचलून धरलीय.
निवडणूक आयोगानं मात्र ही मागणी स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावलीय.