हार्दिक पटेलच्या धमकीनंतर क्रिकेट सामन्यासाठी कडक सुरक्षा

भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान रविवारी तिसरी वनडे गुजरातच्या राजकोट शहरात खेळवली जाणार आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने शनिवारी रात्रीपासून राजकोटमधील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केली आहे.

Updated: Oct 18, 2015, 01:19 PM IST
हार्दिक पटेलच्या धमकीनंतर क्रिकेट सामन्यासाठी कडक सुरक्षा title=

राजकोट : भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान रविवारी तिसरी वनडे गुजरातच्या राजकोट शहरात खेळवली जाणार आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने शनिवारी रात्रीपासून राजकोटमधील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केली आहे.

पटेल समाजासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या हार्दिक पटेलने सामन्या दरम्यान स्टेडीयममध्ये प्रदर्शन करण्याचा इशारा दिला आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार जिल्हाधिकारी मनीषा चंद्रा यांनी म्हटलंय, आम्ही शनिवार रात्रीपासून १० ते १९ ऑक्टोबर सकाळी ८ पर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शांती कायम ठेवण्यासाठी ही उपाय योजना असल्याचं जिल्हाधिकारींनी म्हटलंय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी हे उपाय केले असल्याचं चंद्रा यांनी म्हटलंय.

याआधी हार्दिक पटेलने भारत आणि दक्षिण आफ्रिका टीमचा रस्ता रोखण्याची धमकी दिली आहे. हार्दिक पटेल यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या समुदायाच्या लोकांनीही सामन्याची तिकीट घेतली आहेत, ते मैदानात दाखल होणार आहेत.

हार्दिक पटेल यांनी यापूर्वीच या सामन्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात सामिल होण्याचं आवाहन केलं आहे, ज्यावरून ओबीसी कोट्यासाठी सरकारवर दबाव बनवण्यास मदत होणार आहे.

आंदोलनकर्त्यांच्या इशाऱ्यानंतर राजकोट स्टेडियमला किल्ल्यासारखं संरक्षण देण्यात आलं आहे, सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.